कृतीयुक्त पर्यावरण दिन: ४५ अंश तापमानात सातपुड्याच्या पर्वत रांगेत एक लक्ष बीजारोपण
खामगाव: 'अन्न गुळगुळे;नाळ गुळगुळे ... दुष्काळ ढिशक्याव...ढिशक्याव... ढिशक्याव...!' असा नारा देत सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी बांधवांनी बुधवारी कृतीशील पर्यावरण दिन साजरा केला. बांडापिंपळ हे गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी ४५ अंश तापमानात भर दुपारी एक लाख बियांचं रोपण केले. पाणी फौंडेशनअंतर्गत बांडापिंपळ या आदिवासी गावाने 'सत्यमेव जयते' वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये ग्रामपंचायत सुनगाव, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जळगाव, वनविभाग(प्रादेशिक-जळगाव), तरुणाई फौंडेशन, सालईबन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ५० दिवस श्रमदान करून मोठया प्रमाणात सलग समतल चर खोदण्यात आले. वनतळे, माती बंधारे, दगडी बांध आदी जलसंवर्धनाची कामे करण्यात आली. याच पाणलोट क्षेत्रात बुधवारी जागतिक पर्यावरण दिनी एक लाख बीजारोपनाचा कृतिशील उपक्रम राबविण्यात आला.
Reported by अनिल गवई
#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19